हिंदु राष्ट्राच्या कार्यात आमचा पूर्णपणे सहभागी राहील ! – पू. डॉ. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज, शंकर मठ, राजारामतला, हावडा (बंगाल)

पू. डॉ. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांना समितीचे माहितीपत्रक देतांना श्री. शंभू गवारे, खाली बसलेले  श्री. सुमंतो मुखर्जी आणि  श्री. सीयाराम साहा

हावडा (बंगाल) – हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी येथील शंकर मठ, राजारामतलाचे मठाधीश पू. डॉ. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या वेळी श्री. गवारे यांनी त्यांना समिती करत असलेले राष्ट्र-धर्मविषयक कार्य आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न यांविषयी सांगितले. त्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्हाला कोणते कार्य करायचे आहे, ते ठरवा आणि आम्हाला सांगा. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या या कार्यात आमचा पूर्णपणे सहभाग राहील.’’ याप्रसंगी समितीचे श्री. सीयाराम साहा आणि रा.स्व. संघाचे श्री. सुमंतो मुखर्जी उपस्थित होते.