पाकिस्तान, बांगलादेश या इस्लामी देशांत ‘शरीया’ पद्धतीने सर्व कारभार चालतो आणि तिथे हिंदु अन् शीख यांची लोकसंख्या घटत चालली आहे. तिथे हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा मिळायला हवा. याउलट भारत ‘सेक्युलर’ (निधर्मी) म्हणून घोषित झाला असतांना सुद्धा केवळ मुसलमान, ख्रिस्ती यांनाच अल्पसंख्यांक म्हणून विशेष दर्जा का ? वर्ष २००२ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाच्या एका निकालात म्हटले आहे, ‘राष्ट्रीय स्तरावर कुणी बहुसंख्यांक आणि अल्पसंख्यांक नसणार’. भारतात जो समुदाय साधारणत: २०० खासदार, १ सहस्र आमदार आणि ५ सहस्र स्थानिक लोकप्रतिनिधी निवडून आणू शकतो, तो समुदाय अल्पसंख्यांक कसा काय असू शकतो ?