श्रीरामाचे नाव घेणे गुन्हा असेल, तर १४ वर्षे कारागृहात रहाण्यास सिद्ध ! – नवनीत राणा, खासदार

मुंबई – ‘हनुमान चालिसा’चे पठण करणे आणि श्रीरामाचे नाव घेणे हा गुन्हा असेल अन् त्यासाठी सरकारने मला १४ दिवसांची शिक्षा दिली असेल, तर मी १४ दिवसच काय, तर १४ वर्षे कारागृहात रहाण्यास सिद्ध आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, कारागृहात टाकून ते एका महिलेचा आवाज दाबू शकतील, असे त्यांना वाटत असेल, तर १४ दिवसांत ही महिला दबली जाणार नाही. आमची लढाई देवाच्या नावाची आहे. मी ही लढाई पुढेही लढत राहीन. एका महिलेवर जी क्रूर कारवाई झाली, ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. आधुनिक वैद्यांनी तातडीने पडताळणी होऊन उपचार होणे आवश्यक असल्याचे लिहून दिले, तरी उपचार देण्यात आले नाहीत. कारागृहात माझे मानसिक शोषण झाले.