पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक करणाऱ्या जहांगीरपुरीच्या हिंसाचारातील मुख्य सूत्रधाराला अटक

नवी देहली – येथील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीच्या वेळी झालेल्या हिंसाचारामागील मुख्यम सूत्रधार तबरेज याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेले काही दिवस तो पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत पोलिसांसमवेतच शांतता निर्माण करण्यासाठी फिरत होता. पोलिसांनी हिंसाचारानंतर एकतेसाठी आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेत तो सर्वांत पुढे होता. त्याच्यासमवेत अनाबुल आणि जलील यांनाही अटक करण्यात आली आहे. याच दंगलीच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ८ आरोपींना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

संपादकीय भूमिका

दंगल घडवणारा कोण आहे, हेही ओळखू न शकणारे पोलीस काय काम करत असतील, याची यातून कल्पना येते ! या घटनेची नोंद केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे !