आद्यशंकराचार्य यांचे अलौकिक कार्य

आज (६ मे) ‘आद्यशंकराचार्य जयंती’ आहे. त्या निमित्ताने…

आद्यशंकराचार्य

१. वैदिक धर्माचा प्रसार करणे

मोठमोठ्या नगरांत आणि तीर्थक्षेत्री जाऊन वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आद्यशंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांसह भारतभ्रमण केले अन् त्यांना अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. त्यामुळे पाखंडी आणि वामाचारी संप्रदाय भंगले. देशाच्या सीमा सदैव सुरक्षित असाव्यात, या हेतूने शंकराचार्य यांनी गोवर्धन पीठ (ओडिशा), शृंगेरी पीठ (दक्षिण देश), शारदापीठ (द्वारका) आणि ज्योतिर्मठ (हिमालय) अशा भारताच्या चार दिशांना चार पिठांची स्थापना करून तेथे त्यांच्या चार शिष्यांना पिठाधिपती म्हणून नेमले. कांची कामकोटी आणि काशी येथेही त्यांनी पिठे स्थापन केली.

२. ग्रंथांची निर्मिती करणे

शंकराचार्यांनी १२ उपनिषदांवर भाष्ये लिहिली आणि गीताभाष्यही लिहिले. त्यांनी आपल्या अद्वैत सिद्धांताच्या प्रस्थापनेसाठी दोनशेहून अधिक ग्रंथ रचले. ‘निर्गुणाच्या उपलब्धीसाठी सगुणाची उपासना हे प्रबळ साधन आहे आणि जोवर एखादा साधक सगुण ईश्वराची उपासना करत नाही, तोवर त्याला निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होणार नाही’, असे ते मानत. यासाठी त्यांनी शिव, गणपति, देवी इत्यादी देवतांची सुंदर आणि भावपूर्ण स्तोत्रे रचली आहेत.

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२५.४.२००८)