मदुराई (तमिळनाडू) येथे ५०० वर्षे प्राचीन मठाच्या पालखी यात्रेला द्रमुक सरकारने अनुमती नाकारली !

(द्रमुक – द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे द्रविड प्रगती संघ)

मदुराई (तमिळनाडू) – मयिलादुथुराई महसूल जिल्हा अधिकारी जे. बालाजी यांनी धर्मपूरम् अधीनम् या मठाच्या ‘पट्टिना प्रवेशम्’ या पारंपरिक धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाला अनुमती नाकारली आहे. ‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा आहे. मानवाधिकाराचे कारण देत याला अनुमती नाकारण्यात आली; मात्र मठाच्या पदाधिकार्‍यांनी हा कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. हा कार्यक्रम २२ मे २०२२ या दिवशी होणार आहे. ‘या प्रकरणी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी हस्तक्षेप करावा’, अशी हिंदूंना मागणी केली आहे. हा मठ मीनाक्षी अम्मन मंदिराच्या जवळ आहे.

१. अधीनम्चे २९३ वे प्रमुख हरिहर ज्ञानसंबंदा स्वामीगल यांनी सांगितले की, धर्मपूरम् अधीनम् ५०० वर्षे प्राचीन आहे आणि गेली ५०० वर्षे ही परंपरा चालू आहे. त्याला अचानक अशा प्रकारे अनुमती नाकारल्याने मला दुःख होत आहे. इंग्रजांनीही कधी याला अनुमती नाकारली नव्हती.

२. वैष्णव गुरु मन्नारगुडी श्री सेंडलंगरा जीयर यांनी सांगितले की, ‘पट्टिना प्रवेशम्’ हे  एक धार्मिक अनुष्ठान आहे. याला रोखण्याचा अधिकार कुणालाही नाही.

संपादकीय भूमिका

  • तमिळनाडूचे नास्तिकतावादी द्रमुक सरकार सत्तेत आल्यापासून हिंदुविरोधी निर्णय घेत आहे. याला देशभरातील हिंदु संघटनांनी संघटित होऊन विरोध करण्याची आवश्यकता आहे !