बांगलादेशाच्या पंतप्रधानांनी दिली भारताला चितगाव बंदर वापरण्याची अनुमती !

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर (डावीकडे) बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (उजवीकडे)

ढाका – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताला चितगाव बंदर वापरण्याची अनुमती दिली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी शेख हसीना यांची भेट घेतली असता त्यांनी हा प्रस्ताव संमत केला. चितगाव बंदर हे बांगलादेशचे प्रमुख बंदर आहे. या बंदराच्या माध्यमातून भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंध वृद्धींगत होणार आहे. तसेच आसाम, मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांशी संपर्कही सुधारेल.

एस्. जयशंकर यांनी पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने नवी देहलीला भेट देण्याचे निमंत्रण दिले. जयशंकर यांनी नंतर बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल मोमेन यांच्याशी चर्चा केली.