देवबंद (उत्तरप्रदेश) येथील इस्लामी शिक्षण संस्थेतून बांगलादेशी तरुणाला अटक

बांगलादेशी घुसखोर तरुण तलहा तारूलकदार बिन फारुख

सहारणपूर (उत्तरप्रदेश) – आतंकवादविरोधी पथकाने देवबंद येथील ‘दरुल उलूम’ या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेल्या एका बांगलादेशी तरुणाला अटक केली. तो बनावट ओळखपत्राद्वारे येथे शिकत होता. या तरुणाकडून बांगलादेशी चलन, पुस्तके आणि अन्य काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या तरुणाचे पाकिस्तानशीही संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. हा तरुण वर्ष २०१५ पासून देवबंद येथे रहात होता. (जवळपास ७ वर्षे हा तरुण भारतात घुसखोरी करून रहात असतांना सुरक्षायंत्रणांना याची माहिती मिळत नाही, हे लज्जास्पद आहे ! असे किती बांगलादेशी भारतात रहात आहेत, याची गणतीच नाही. त्यांना शोधून भारतातून कधी हाकलणार ?, हाही प्रश्‍नच आहे ! – संपादक)

त्याचे नाव तलहा तारूलकदार बिन फारुख असून तो बांगलादेशमधील चितगावचा रहाणारा आहे. त्याने मेघालय येथून बनावट आधारकार्ड बनवले होते.