किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना १४ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा !

मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नगरसेवक नील सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा १४ जूनपर्यंत कायम ठेवला आहे. पुढील सुनावणीपर्यंत त्या दोघांनाही अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. या कालावधीत त्यांना अटक झाल्यास त्यांची ५० सहस्र रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका करण्याचे निर्देशही देण्यात आले. आय.एन्.एस्. निधीतील अपहारप्रकरणी त्या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी सोमय्या यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.