गेल्या २४ घंट्यांत देशात कोरोनामुळे १ सहस्र ३९९ रुग्णांचा मृत्यू

नवी देहली – देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे नवे २ सहस्र ४८३ रुग्ण आढळून आले आहेत, तर दिवसभरात १ सहस्र ३९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाचे १५ सहस्र ६३६ रुग्ण आहेत. दिवसभरात १ सहस्र ९७० रुग्णांनी कोरोनावर मात केली. देशाचा कोरोनामुक्त होण्याचा दर ९८.७५ टक्के, तर दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर ०.८४ टक्के नोंदवण्यात आला. देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८७ कोटी ९५ लाख ७६ सहस्र ४२३ डोस देण्यात आले आहेत. दक्षता म्हणून आतापर्यंत २ कोटी ६७ लाख १३ सहस्र ३२९ वर्धक मात्रा (बूस्टर डोस) देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.