मुंबई येथील कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा जयंत पात्रीकर यांनी सादर केलेल्या ‘अष्टपदी’ या प्रकाराचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

मुंबई येथील कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा जयंत पात्रीकर (कथ्थक अलंकार) यांनी कथ्थक नृत्याच्या अंतर्गत सादर केलेल्या ‘अष्टपदी’ या प्रकाराचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने कथ्थक नृत्याविषयी करण्यात आलेल्या संशोधनात्मक प्रयोगाची क्षणचित्रे !

‘१९.४.२०२२ या दिवशी ‘बोरीवली (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा जयंत पात्रीकर (कथ्थक अलंकार) यांनी कथ्थक नृत्याच्या अंतर्गत ‘अष्टपदी’ (टीप) हे नृत्य सादर केले. ‘या नृत्याचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या अन् त्रास असलेल्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात संशोधनात्मक प्रयोग करण्यात आला.

 

टीप – हा ८ कडव्यांनी युक्त असा एक काव्यप्रकार आहे. अष्टपदीचा प्रसार मुख्यतः गीतगोविंदकार कवी जयदेव यांनी केला. अष्टपदी ही विशेषकरून श्रीकृष्णाच्या जीवनदर्शनावर आधारित असते. यामध्ये राधेची कृष्णावरील ‘मधुराभक्ती’ दिसून येते.


सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ  यांना आलेली अनुभूती

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘सौ. मनीषा पात्रीकर यांनी नृत्याचे सादरीकरण करण्यापूर्वी वातावरणात काही प्रमाणात त्रासदायक स्पंदने जाणवत होती. नृत्याचे सादरीकरण चालू होताच वातावरणातील दाब हळूहळू न्यून होऊन आनंदाचे प्रमाण वाढले.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

कथ्थक नृत्य सादर करताना सौ. मनीषा जयंत पात्रीकर

१. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांवर झालेला परिणाम

१ अ. साधकांना आलेल्या चांगल्या अनुभूती

१. ‘अष्टपदीचे सादरीकरण होत असतांना आरंभी हलकेपणा जाणवून नंतर आनंद आणि चैतन्य यांचे प्रमाण वाढले.’ – कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि कु. म्रिणालिनी देवघरे

२. ‘अष्टपदी पहातांना मला माझे आज्ञाचक्र आणि विशुद्धचक्र यांवर चांगल्या संवेदना जाणवल्या, तसेच करुण रस जाणवला. या वेळी मला दैवी सुगंध आला.’ – पशूवैद्य अजय जोशी (वय ६६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)

१ आ. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणाचा निष्कर्ष

आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांतील नकारात्मक ऊर्जा १५ ते २० टक्के न्यून झाली आणि सकारात्मक ऊर्जा दुपटीने वाढली.

२. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

२ अ. साधकांना आलेल्या त्रासदायक अनुभूती

१. काही साधकांच्या शारीरिक वेदनांत वाढ झाली.

२. एका साधिकेला नृत्यातील चैतन्य सहन न झाल्याने अनाहतचक्राच्या ठिकाणी पुष्कळ त्रास जाणवत होता.

२ आ. साधकांना आलेल्या चांगल्या अनुभूती

१. अनेक साधकांना अनाहतचक्राच्या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवल्या आणि त्यांची भावजागृती झाली.

२. नृत्य पहातांना सर्वच साधकांना आनंदाची अनुभूती आली.

३. अन्य २ विदेशी साधिकांना नृत्य पहातांना भगवान शिवाचे तत्त्व अनुभवायला मिळाले.

२ आ. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणाचा निष्कर्ष : आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांतील नकारात्मक ऊर्जा १५ ते २० टक्के न्यून झाली आणि सकारात्मक ऊर्जा दुपटीहून अधिक वाढली.

३. नृत्यांगना सौ. मनीषा पात्रीकर यांच्यावर झालेला परिणाम

३ अ. आलेल्या चांगल्या अनुभूती

१. ‘हे नृत्य करतांना या नृत्यासाठी वापरलेल्या संगीतात एका ठिकाणी बासरीची धून वाजते. त्यावर नृत्य करतांना मला माझ्या उजव्या बाजूला काही वेळ मोरपंखी रंगाचा प्रकाश दिसून श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवले.

२. हे नृत्य सादर करतांना माझी भावजागृती झाली.’

– सौ. मनीषा पात्रीकर

३ आ. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणाचा निष्कर्ष

सौ. मनीषा पात्रीकर यांच्यातील नकारात्मक ऊर्जा ३ ते १० टक्के न्यून झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा तिपटीहून अधिक वाढली.

४. निष्कर्ष

या प्रयोगाच्या वेळी नृत्य करतांना सौ. मनीषा पात्रीकर यांची भावजागृती झाली. हे नृत्य पहातांना उपस्थित साधकांना त्यांच्या स्वतःच्या अनाहतचक्रावर चांगल्या संवेदना जाणवल्या आणि त्यांची भावजागृती झाली. सौ. पात्रीकर यांच्यातील भावामुळे त्यांना स्वतःला आणि साधकांना सारखीच अनुभूती आली. ‘कथ्थक’ हे सात्त्विक नृत्य आहे आणि हे नृत्य सौ. मनीषा पात्रीकर यांनी भावपूर्णरित्या सादर केले. त्यामुळे त्यातील सात्त्विकता सहन न झाल्याने आध्यात्मिक त्रास असणाऱ्या साधकांना त्रास देणाऱ्या वाईट शक्तींना त्रास झाला; परिणामस्वरूप साधकांच्या शारीरिक वेदनांमध्ये वाढ झाली आणि या नृत्यातून आध्यात्मिक लाभ होऊन त्यांची अस्वस्थता वाढली. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाच्या माध्यमातूनही त्रास असलेल्या साधकांची सकारात्मकता वाढल्याचे आणि नकारात्मकता न्यून झाल्याचे लक्षात आले, तसेच त्रास नसलेल्या साधकांची सकारात्मकता वाढल्याचे लक्षात आले. ‘नृत्य भावपूर्ण केल्याने त्यातून अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते’, हे यावरून सिद्ध होते.’

– सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, नृत्य परीक्षक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.४.२०२२)

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक