नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ‘अॅम्वे इंडिया’ या आस्थापनाच्या ७५७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर आर्थिक अपव्यवहार कायद्याच्या अंतर्गत टाच आणली आहे. ‘या आस्थापनाने दिलेल्या बहुतेक उत्पादनांच्या किमती या खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्रतिष्ठित उत्पादकांच्या तुलनेत अधिक आहेत’, असे ईडीने म्हटले आहे.
टाच आणलेल्या एकूण ७५७ कोटी ७७ लाख रुपयांच्या मालमत्तेपैकी ४११ कोटी ८३ लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे, तर उर्वरित ३४५ कोटी ९४ लाख रुपये अॅम्वेच्या ३६ बँक खात्यांमध्ये जमा असलेली रक्कम आहे.
ED Attaches Assets Of Amway India Enterprises Private Limited, a company accused of running a multi-level marketing scam.#startuptalky #stnews #amwayindia #ED #amway #amwaylife #enforcementdirectorate #scam #startupnews #startupnewsdaily #startupnewssindia pic.twitter.com/rcLN6VFb0W
— StartupTalky (@startuptalky) April 19, 2022