नौदलातील १ सहस्र युक्रेनी सैनिकांनी केले आत्मसमर्पण ! – रशियाचा दावा

मॉस्को (रशिया) – युक्रेनच्या मरियुपोल या समुद्रकिनारी वसलेल्या शहरावर गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आक्रमण करत आहे. लक्षावधी शहरवासियांनी तेथून पलायन केले आहे. शहरातील असंख्य इमारती रशियन बाँब आक्रमणांमध्ये नष्ट झाल्या आहेत. अशातच ‘युक्रेनच्या नौदलातील १ सहस्रांहून अधिक सैनिकांनी रशियन सैनिकांपुढे शस्त्रे टाकून आत्मसमर्पण केले आहे’, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला. यांमध्ये १६२ सैन्याधिकाऱ्यांचा समावेश असल्याचेही रशियाने म्हटले. यासंदर्भात रशियाने एक व्हिडिओही जारी केला. युक्रेनने मात्र हा दावा फेटाळून लावला.

रशियन आक्रमणामध्ये आतापर्यंत मरियुपोल शहरातील २१ सहस्र नागरिक मारले गेले असून १ लाख नागरिक अजूनही शहरात अडकले आहेत.