राज्यांनी प्राणवायुच्या तुटवड्यामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी दिली नाही ! – केंद्र सरकार

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार

नवी देहली – कोरोनाकाळात कोणत्याही राज्य सरकारने अथवा केंद्रशासित प्रदेशाने प्राणवायुच्या (ऑक्सिजनच्या) तुटवड्यामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती अद्याप दिलेली नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी ५ एप्रिल या दिवशी संसदेत प्रश्‍नोत्तराच्या सत्रात दिली. केंद्र सरकारने प्राणवायुच्या तुटवड्यामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती मागवली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. ४ एप्रिल २०२२ पर्यंत कोरोनामुळे देशात एकूण ५ लाख २१ सहस्र ३५८ जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.