श्रीसत्‌शक्ति बिंदाई, आम्ही नतमस्तक झालो तुझ्या चरणांवरी ।

कु. भावना कदम

श्रीसत्‌शक्ति बिंदाई (टीप १)
तुझ्या चैतन्यवाणीने ।
धन्य झालो आम्ही ।। १ ।।

या नवरात्रीच्या दिनी ।
नवदुर्गांची स्तुती ऐकली ।। २ ।।

लक्ष्मी, तुझ्या चैतन्यमय वाणीतूनी ।
भावविभोर झालो आम्ही ।। ३ ।।

अनुभवली अंबिकेची छबी ।
आपत्काळात नवदुर्गांची भक्ती करून घेतली ।
भावाच्या स्तरावरूनी कृतज्ञ असे तव चरणी ।। ४ ।।

तुझ्या मधुर आर्ततेने वाटे ।
साक्षात् नवदुर्गाच आमच्या घरी आल्या ।
किती जन्मांची पुण्याई आमची ।
लाभली विष्णुस्वरूप गुरुमाऊली ।। ५ ।।

आता कृतज्ञता व्यक्त करण्यास कंठ आला दाटूनी ।
आम्ही नतमस्तक झालो तुझ्या चरणांवरी ।। ६ ।।

टीप १ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

– कु. भावना कदम, नंदुरबार (२४.१०.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक