कर्नाटक शासन पाठ्यपुस्तकातील ब्राह्मण समाजाची भावना दुखावणारे लिखाण हटवणार !

कर्नाटकाच्या भाजप शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! असे ब्राह्मणद्वेषी लिखाण हटवण्यासह लिखाण करणार्‍या ब्राह्मणद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक

बेंगळुरू (कर्नाटक) – पाठ्यपुस्तकात असलेले ब्राह्मण समाजाची भावना दुखावणारे लिखाण काढून टाकावे आणि त्याठिकाणी सनातन धर्माची माहिती जोडावी, अशी सूचना कर्नाटक शासनाने स्थापन केलेल्या शालेय पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समितीने केली आहे.

१. इयत्ता ८ वीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील ६ व्या अध्यायातील प्रास्तविक भागामध्ये म्हटले आहे, ‘वैदिक काळात, हवनाच्या वेळी ब्राह्मण तूप आणि दूध यांचा वापर करत असल्याने अन्नाची टंचाई निर्माण झाली होती. (ब्राह्मणद्वेषापायी किती खालच्या थराला जाऊन अतार्किक माहिती पाठ्यपुस्तकांमध्ये घुसडली गेली होती, हे यातून लक्षात येते ! – संपादक) जी संस्कृत भाषा धार्मिक विधींमध्ये मंत्रोच्चारात वापरली जात होती, ती त्यावेळच्या सामान्य लोकांना समजत नव्हती. बौद्ध आणि जैन धर्म सोप्या मार्गाने शिकवले गेले, ज्यामुळे या धर्मांची वाढ झाली.’ या लिखाणामुळे ब्राह्मणांच्या भावना दुखावू शकतात. त्यामुळे हे लिखाण काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

२. फेब्रुवारी २०२१ मध्ये कर्नाटक राज्य ब्राह्मण विकास मंडळाच्या सदस्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील एका प्रकरणाच्या काही भागांवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर येडियुरप्पा सरकारने १७ फेब्रुवारी २०२१ या दिवशी एक परिपत्रक जारी करून हा धडा शिकवला जाऊ नये किंवा मूल्यमापनासाठी वापरला जाऊ नये, असे निर्देश दिले होते.