सांगली, ३१ मार्च (वार्ता.) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी प्राणाची पर्वा न करता हिंदु धर्मासाठी बलीदान केले. त्या वेळी औरंगजेबाच्या दहशतीमुळे छत्रपती संभाजी महाराज यांची अंत्ययात्रा निघू शकली नव्हती. या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिकात्मक अंत्ययात्रा (मूकपदयात्रा) काढण्यात येते.
ही यात्रा १ एप्रिल या दिवशी सांगली येथे सकाळी ७ वाजता मारुति चौक येथून, तर कोल्हापूर येथे बिंदू चौक येथे सायंकाळी ६ वाजता निघणार आहे. तरी या मूकपदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.