जयपूर येथे ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक

१० किलो आर्.डी.एक्स. जप्त

जयपूर (राजस्थान) – जयपूर आणि चितोडगड पोलिसांनी जयपूरमध्ये बाँबस्फोट करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी जुबेर, अल्तमस आणि सरफुद्दीन या ३ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बाँब बनवण्यासाठीचे १० किलो आर्.डी.एक्स. हे स्फोटक, तसेच टायमर जप्त केले आहे. हे आतंकवादी मध्यप्रदेशातील रतलाम येथील रहाणारे आहेत.