१. ‘सनातन प्रभात’मुळे घरातील वातावरण सकारात्मक होते !
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पहिल्या पानावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार मी प्रथम वाचते. दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे घरातील वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. आध्यात्मिक उपाय होतात. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रूपाने भगवंत समवेत असल्याची जाणीव होते.
– श्रीमती सविता तावडे, सांताक्रूझ, मुंबई
२. दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे मी आणि कुटुंबीय सेवा करू लागलो !
दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे मला साधना समजली. सेवेचे महत्त्व समजले. त्यामुळे मी, माझे यजमान आणि मुली साधना म्हणून थोडीफार सेवा करू लागलो. घरात सेवा चालू केल्यापासून घरात चैतन्य जाणवू लागले. दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे दिवसाचा चैतन्यमय प्रारंभ आहे. त्याचे वाचन केल्यामुळे बुद्धीवरील आवरण दूर होते आणि आध्यात्मिक उपाय केल्याने शरिराची मरगळ निघून जाते.
– सौ. शर्वरी चव्हाण, वरळी, मुंबई
३. दैनिक सनातन प्रभात डोळ्यांवर फिरवल्यापासून कोणताही त्रास न होता डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहिले !
३ वर्षांपूर्वी मी माझे डोळे पडताळणीसाठी नेत्रतज्ञांकडे गेले होते. मोतीबिंदू असल्याने त्यांनी मला शस्त्रकर्म करण्यास सांगितले होते. मी प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातची गुंडाळी करून ती डोळ्यांसह अन्य अवयव यांवर फिरवते. त्या गुंडाळीतून मी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव यांच्या चरणांना सूक्ष्मातून पहाते. आता पडताळणीसाठी गेल्यावर नेत्रतज्ञ मला सांगतात, ‘‘तुमचे डोळे आता अगदी उत्तम आहेत.’’ दैनिकाच्या माध्यमातून आध्यात्मिक उपाय होत असल्यानेच माझे डोळे चांगले राहिले.
– श्रीमती शैलजा लोथे, नागपूर
४. मी प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतो. कधी कधी वितरण करण्यासाठी मला घरून निघायला विलंब होतो. तेव्हा मला काळजी वाटते; पण प्रत्यक्षात त्या वेळी मला एकाही ‘सिग्नल’वर थांबावे लागत नाही. त्यामुळे विनाअडथळा दैनिक वितरण पूर्ण होते.
– श्री. दिनेश काणे, नागपूर
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |