नदिया (बंगाल) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून परतणार्‍या भाजपच्या खासदाराच्या वाहनावर बाँबफेक

सुदैवाने बाँब वाहनाच्या मागे पडल्याने खासदार बचावले !

  • बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आधीच दयनीय असतांना आता अशा घटना पाहून धर्मांधांनी बंगालचे दुसरे काश्मीर केल्यास आश्‍चर्य वाटू नये ! ही स्थिती पालटण्यासाठी बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लावणेच आवश्यक ! – संपादक
  • ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाद्वारे काश्मीरमधील हिंदूंचा धर्मांधांनी केलेला नरसंहार दाखवल्यानंतर हिंदूंना नाही, तर धर्मांधांनाच राग येतो, हे लक्षात घेतले पाहिजे ! – संपादक
भाजपचे खासदार जगन्नाथ सरकार (डावीकडे)

नदिया (बंगाल) – येथील भाजपचे खासदार जगन्नाथ सरकार यांनी आरोप केला की, ते येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून घरी परतत असतांना त्यांच्या वाहनावर बाँब फेकण्यात आला. वाहन वेगात असल्याचे हा बाँब गाडीच्या मागे पडल्याने आम्ही बचावलो. यात कोणतीही हानी झाली नाही.

खासदार जगन्नाथ सरकार म्हणाले की, ममता बनर्जी यांच्या सरकारमध्ये बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत वाईट आहे. येथे राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे. त्याखेरीज अशा घटना थांबणार नाहीत.