सियोल (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियाने केलेली क्षेपणास्त्र चाचणी अयशस्वी झाल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या सैन्याने दिली. हे क्षेपणास्त्र अवकाशात झेपावल्यानंतर लगेचच त्याचा स्फोट झाला. ही चाचणी उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयंग येथील विमानतळाजवळ असलेल्या क्षेत्रातून करण्यात आली होती. उत्तर कोरियाकडून येथूनच आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात येते, असा दावा अमेरिकेकडून अनेक वेळा करण्यात आला आहे.