गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाने १७५ आतंकवाद्यांना ठार केले !

काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी तेथील आतंकवाद पाकला नष्ट केल्याखेरीज संपणार नाही, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंह

नवी देहली – केंद्रीय राखीव पोलीस दलाने १ मार्च २०२१ ते १६ मार्च २०२२ या वर्षभराच्या कालावधीमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये १७५ आतंकवाद्यांना ठार केले, तर १८३ जणांना कह्यात घेतले, अशी माहिती या दलाचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी दिली. केंद्रीय राखीव पोलीस दलाने १९ माओवाद्यांना ठार केले, तर साम्यवादी कट्टरतावादी संघटनेतील ६९९ जणांना वेगवेगळ्या कारवायांमध्ये या एका वर्षाच्या काळात अटक केल्याचेही कुलदीप सिंह यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रहित केल्यानंतर दगडफेकीच्या घटना जवळजवळ बंद झाल्या आहेत. बाजूच्या देशांकडून करण्यात येणारी आतंकवादी आक्रमणे आणि घुसखोरीचे प्रमाणही अल्प झाले आहे, अशी माहितीही कुलदीप सिंह यांनी दिली.