आपकडून खलिस्तानसाठी जनमत संग्रहाचा प्रस्ताव संमत करण्याचे आमीष !

निवडणुकीत समर्थन देण्यासाठी पैशांचेही आमीष दाखवल्याची माहिती

‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घातलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा दावा

केंद्र सरकारने या दाव्याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे ! – संपादक

नवी देहली – आम आदमी पक्षाने १७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी आमच्या संघटनेच्या नावाने एक खोटे पत्र प्रसारित करून आमच्या संघटनेचा ‘आप’ला पाठिंबा असल्याचे यात म्हटले होते, असा दावा बंदी घातलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ ने केला आहे. या संघटनेने लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, ‘आप’चे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी आम्हाला दूरभाष करून १७ फेब्रुवारीच्या पत्राचे दायित्व घेण्यास सांगितले होते. इतकेच नव्हे, तर यासाठी आम्हाला पैसे देण्यासह जर आपची पंजाबमध्ये सत्ता आली, तर विधानसभेमध्ये खलिस्तानसाठी जनमत संग्रहाचा प्रस्ताव संमत करू’, असेही म्हटले होते, असा दावाही या संघटनेने केला आहे. ‘ऑप इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाने याविषयीचे वृत्त प्रकाशित केले आहे.

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला विजय मिळाल्यानंतर  काही घंट्यांतच बंदी घातलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ ने आपचे नेते राघव चढ्ढा यांच्या नावाने पत्र पाठवले आहे. यात त्यांनी आम आदमी पक्षाला या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी खलिस्तान समर्थकांकडून आर्थिक पाठबळ मिळाल्याचा आणि मतदान झाल्याचा दावा केला आहे. या आर्थिक पाठबळामध्ये विदेशी लोकांचाही समावेश असल्याचे म्हटले आहे.