रॉबर्ट वाड्रा यांनी गेल्या ११ वर्षांत १०६ कोटी रुपयांचे उत्पन्न लपवल्याचा आयकर विभागाचा दावा

प्रियांका वाड्रा यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा

नवी देहली – आयकर विभागाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात १०६ कोटी रुपयांचे उत्पन्न लपवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे विभागाने ही रक्कम वर्ष २०१०-११ ते २०२०-२१ या वर्षात मिळालेल्या उत्पन्नात जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत वाड्रा यांच्या विरुद्ध राजस्थानमधील भूमीच्या व्यवहारातून मिळालेल्या उत्पन्नाची माहिती लपवल्याचाही आरोप आहे.