परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात ‘श्रीसत्‌शक्ति बिंदा सिंगबाळ यांनी भेटायला यावे’, असा विचार येणे आणि त्या दिवशीच त्या भेटायला येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

(परात्पर गुरु) डॉ. आठवले : एके दिवशी माझ्या मनात ‘आज श्रीसत्‌शक्ति बिंदाताई भेटायला आल्या, तर बरे होईल. मला त्यांना काही सूत्रे सांगायची आहेत’, असा विचार आला. नेमक्या त्या दिवशीच मला त्या भेटायला आल्या. देवाने त्यांच्या मनातही मला भेटण्याचा विचार घातला. यामागील शास्त्र काय ?

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

सप्तर्षी : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात येणारा प्रत्येक विचार हा ईश्वराचाच विचार आहे. त्यांच्या मनात ‘श्रीसत्‌शक्ति बिंदाताई आल्या तर बरे होईल’, असा विचार येता क्षणीच ईश्वराने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मनात गुरुदेवांकडे जाण्याचा विचार दिला. ही घटना सामान्य नसून ‘ही गुरु-शिष्य यांच्यातील एकरूपता दर्शवते.’ एवढेच नव्हे, तर ‘पुढे साधकांसाठी गुरुदेवांच्या मनात येणारा प्रत्येक विचार पूर्ण करण्याची क्षमता केवळ आणि केवळ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यात आहे’, हेही दर्शवते. येणार्‍या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिक कार्य अशाच पद्धतीने होणार आहे. ‘गुरुदेवांच्या मनात एखादा विचार आल्यावर त्याचा पडसाद शिष्य श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मनात उमटणे आणि गुरुतत्त्वाला अपेक्षित अध्यात्मप्रसाराचे कार्य शिष्य श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून प्रत्यक्ष कृतीच्या स्वरूपात घडणे’, अशा पद्धतीने कार्य होणार आहे.’

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, २७.५.२०२१, सकाळी ८.४९)


श्री. विनायक शानभाग

‘गुरुदेव, महर्षींनी वरील दोन्ही प्रश्नांची उत्तरे केवळ एका वाक्यात दिली होती. मी हे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘दादा, तुम्ही उत्तर लिहा.’’ टंकलेखन करायला आरंभ केल्यावर माझ्या नकळत वरीलप्रमाणे वेगळ्या भाषेत उत्तराचे टंकलेखन झाले. अशी अनुभूती मला पहिल्यांदाच आली.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), चेन्नई (२७.५.२०२१, दुपारी ३)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक