लातूर येथील एका हत्येप्रकरणी धर्मांध आणि अन्य आरोपी यांना न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा !

लातूर – शहरातील संजयनगर येथे १६ एप्रिल २०१८ या दिवशी झालेल्या हत्येच्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.व्ही. गुजराथी यांनी १७ फेब्रुवारी या दिवशी ८ आरोपींना जन्मठेप, तसेच प्रत्येकी १० सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी आरोपी हाजीअली दस्तगीर सय्यद, युसुफ फारूख शेख, जब्बार सत्तार सय्यद, शन्नो अन्वर सय्यद, अन्वर दस्तगीर सय्यद, दौलत शेख, सलीम सय्यद, बाळू सूर्यवंशी या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आरोपी अन्वर सय्यद आणि मृत शादुल राज अहमद शेख यांचा बर्फाच्या गोळ्याचा व्यवसाय होता. या व्यवसायातील लाभावरून घटनेच्या दीड वर्षापूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपी अन्वर सय्यद यांनी शादुल शेख यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार मृत्यूमुखी पडलेले शादुल शेख यांच्या पत्नीने विवेकानंद चौक पोलीस ठाण्यामध्ये केली होती. (या प्रकरणावरून धर्मांधांची क्रूर मानसिकता जाणा ! – संपादक)