वणी (यवतमाळ) येथे शेकडो मोकाट गुरे नाहीशी; तेलंगाणात तस्करीचा संशय ! 

  • राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असूनही दुसर्‍या राज्यात गोवंशियांची तस्करी होणे, हे सरकारसाठी लज्जास्पद ! – संपादक
  • अशा घटनांच्या संदर्भात प्राणीप्रेमी कधी आवाज का उठवत नाहीत ? – संपादक

वणी (यवतमाळ), १६ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील शेकडो मोकाट गुरांचा रस्त्यांवर ठिय्या असायचा. त्यामुळे कित्येक अपघातही घडले होते. अलीकडे मात्र रस्त्यावर दिसणारा हा गोवंश अचानक दिसेनासा होत असल्याचे लक्षात येत आहे. या गोवंशियांची कत्तलीसाठी तेलंगाणात तस्करी होत असल्याची चर्चा आहे. मध्यंतरी नगरपालिकेने लोकांच्या तक्रारींना कंटाळून मोकाट गुरांना कोंडवाड्यात कोंडले; पण गुरांचे मालक किंवा अन्य कुणीही त्यांना सोडवायला आले नाही. शेवटी काही गुरांचा लिलाव करून बाकी गुरे सोडून देण्यात आली. याच घटनेचा अपलाभ घेऊन ही तस्करी चालू असल्याचा संशय आहे.