जगप्रसिद्ध नालंदा विश्‍वविद्यालय लोकांसाठी बनले आकर्षणाचे केंद्र !

पाटलीपुत्र –बिहारमधील नालंदा विश्‍वविद्यालय हे जगातील पहिले विश्‍वविद्यालय होते. तेे एकेकाळी ज्ञानाचे आंतरराष्ट्रीय केंद्र राहिले आहे. या विश्‍वविद्यालयाची स्थापना गुप्त राजघराण्याच्या काळात ५ व्या शतकामध्ये झाली होती. तेथे संपूर्ण जगभरातून ज्ञानार्जनासाठी विद्यार्थी येत होते. ख्रिस्ताब्द ११९३ ला इस्लामी आक्रमकांनी ते उद्ध्वस्त केले. आता ते परत नवीन स्वरूपात उभारले जात आहे. त्यामुळे विश्‍वविद्यायाचे हे नवीन रूप लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

१. प्राचीन नालंदा विश्‍वविद्यालयाच्या परिसरात ५२ तलाव होते. ते तलावही नालंदा विश्‍वविद्यालयाच्या समकालीन समजले जातात. विश्‍वविद्यालयाचे आचार्य आणि विद्यार्थी या तलावाचा उपयोग करत असत. याशिवाय तेथील पाण्याचा गावकरी दैनंदिन कामासाठी आणि शेतीच्या सिंचनासाठी उपयोग करायचे. पूर्वीच्या काळी तलाव हे पावसाळ्यातील जल संसरक्षणाचे मुख्य केंद्र होते.

२. या विश्‍वविद्यालयाचे काही अवशेष शिल्लक होते. सध्याच्या नीतीश कुमार सरकारने त्याचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आणि आता ते नवीन स्वरूपात ज्ञानार्जन करण्यास सज्ज आहे.