श्रीमती ज्योती राणेकाकूंना अल्प ऐकू येते. परात्पर गुरुदेव त्यांच्याशी बोलत असतांना तेवढेच बोलणे त्यांना ऐकू आले. त्यानंतर ते इतर साधकांशी बोलत असतांना त्यांना त्यातील काहीच ऐकू आले नाही. याविषयी बोलतांना त्या म्हणाल्या, ‘‘देवाला मला जे सांगायचे होते, तेवढेच त्याने मला ऐकवले.’’ गुरुवाणीतील चैतन्यामुळेच त्यांना तेवढेच ऐकू आल्याचे माझ्या लक्षात आले आणि मला पुढील श्लोकाची आठवण झाली.
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ।।
अर्थ : ज्याची कृपा मुक्यालाही बोलते करते आणि पांगळ्यालाही पर्वत ओलांडण्यास समर्थ बनवते, त्या परमानंदस्वरूप माधवाला (श्रीकृष्णाला) मी नमस्कार करतो.
ही गुरुकृपेची अनुभूती असल्याचे मला जाणवले. साधकांवर अपार प्रीती करणार्या परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
– श्रीमती रजनी साळुंके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |