स्वित्झर्लंड तंबाखूवरील विज्ञापनांच्या संदर्भात जनमत घेणार !

ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यांसह अनेक युरोपीय देशांनी यापूर्वीच घातली आहे बंदी !

धूम्रपानावर बंदीसाठी स्वित्झर्लंडमध्ये जनमत

बर्न (स्वित्झर्लंड) – तंबाखूवरील विज्ञापनांवर बंदी घालण्याच्या स्वित्झर्लंड सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून १३ फेब्रुवारी या दिवशी जनमत घेण्यात येणार आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यांसह अनेक युरोपीय देशांनी अनेक वर्षांपूर्वीच पब आणि रेस्टॉरेंट्स येथे धूम्रपानावर बंदी घातली आहे. यासमवेतच तंबाखूवरील विज्ञापनांवरही तेथे बंदी घालण्यात आली आहे. आता स्वित्झर्लंड सरकारच्या तंबाखूविषयीच्या मुळमुळीत धोरणाला होणारा विरोध वाढल्याने तेथील सरकारने जनमत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

‘फिलिप मॉरिस’, ‘ब्रिटिश अमेरिकन टोबॅको’, ‘जॅपॅन टोबॅको’ यांसारख्या तंबाखूच्या मोठ्या आस्थापनांची मुख्यालये स्वित्झर्लंडमध्येच आहेत, असे वृत्त बीबीसी वृत्तवाहिनीने दिले आहे.