कर्नाटक सरकारने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने सांगू नये. त्याने त्याच्या देशातील कृष्णवर्णियांना कशी वाईट वागणूक दिली जात आहे, त्याकडे लक्ष द्यावे !
वॉशिंग्टन (अमेरिका) – धार्मिक पोषाख घालायचा कि नाही हे कर्नाटक सरकारने ठरवू नये. एखाद्याचे धार्मिक स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी त्याला त्याच्या धर्माचा पोषाख परिधान करण्याच्या स्वातंत्र्याचाही समावेश असायला हवा, असे मत अमेरिकेच्या प्रशासनातील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याच्या प्रकरणात अमेरिकेचे राजदूत रशद हुसेन यांनी व्यक्त केले आहे.
The US Ambassador at Large for International Religious Freedom, Rashad Hussain, has criticised the hijab ban imposed by the Indian state of Karnataka, saying the Indian state “should not determine permissibility of religious clothing”. #DSTV #India #HijabBan #KarnatakaHijabRow pic.twitter.com/lNDyHv1r6O
— Daily Scoop TV (@DailyScoopTV1) February 12, 2022
मूळ भारतीय वंशाचे हुसेन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हे मत व्यक्त केले आहे. (धर्मांध कोणत्याही देशातील असले आणि कोणत्याही उच्च पदावर गेले, तरी ते त्यांच्या धर्माच्या बाजूने चुकीची गोष्ट असली, तरी तिचे समर्थन करण्यासाठी पुढे येतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)