कर्नाटकातील काही शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांकडून नमाजपठण !

  • कर्नाटक भारतात आहेत कि पाकिस्तानात ? हे विद्यार्थी शाळेत शिक्षणासाठी येतात कि धार्मिक कृती करण्यासाठी ? अशा प्रकारचे शाळेच्या नियमांचे भंग करून कृती करणार्‍यांना शाळेतून काढून टाकले पाहिजे !
  • शाळांमध्ये श्रीमद्भगवदगीता शिकवण्यावरून ‘शिक्षणाचे भगवेकरण’ होत असल्याची ओरड करणारे आता शाळांमध्ये नमाजपठण करूनही ‘शिक्षणाचे इस्लामीकरण’ होत असल्याचे म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या !

बागलकोटे (कर्नाटक) – कर्नाटक राज्यात हिजाबवरून प्रकरण तापलेले असतांना आता राज्यातील काही शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थी नमाजपठण करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित होत आहे. काही वृत्तवाहिन्यांनीही याविषयीचे वृत्त प्रसारित केले आहे.

बागलकोटे येथील एका शाळेचा व्हिडिओ समोर आला असून त्यात ६ मुसलमान विद्यार्थी वर्गामध्ये नमाजपठण करत असल्याचे दिसत आहे. शाळेने याला अनुमती दिली नसतांना नमाजपठण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याविषयीचा ‘सी.एन्.एन्. न्यूज १८’चा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

कडबा (मंगळुरू)- येथील शाळेतील मुसलमान विद्यार्थिनींकडून शुक्रवारी स्थानिक मशिदीमध्ये जाऊन नमाजपठण करण्याची मागणी
मंगळुरूच्या कडबा तालुक्यातील अनकथाडका येथील सरकारी शाळेमध्येही मुसलमान विद्यार्थी वर्गामध्ये नमाजपठण करत असल्याचे दिसून आले आहे.

याचाही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. हा व्हिडिओ ४ फेब्रुवारीचा असल्याचे म्हटले जात आहे. यानंतर स्थानिक लोकांनी नमाजपठणाला विरोध चालू केला आहे. यामुळे राज्य शिक्षण विभागाने शाळेत जाऊन माहिती घेतली. काही मुसलमान विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रशासनाकडे ‘शुक्रवारच्या दिवशी नमाजपठण करण्यासाठी स्थानिक मशिदीमध्ये जाण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी केली आहे.