९ वर्षांपूर्वी जळून मृत्यू पावलेली महिला मीच असल्याचा ४ वर्षांच्या मुलीचा दावा

राजस्थानमध्ये पुनर्जन्माची घटना !

  • लक्षावधी वर्षांपासून चालत आलेला हिंदु धर्मातील पुनर्जन्माचा सिद्धांत सत्यात उतरत आहे, यावरून हिंदु धर्माची महानता लक्षात येते !
  • याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना काय म्हणायचे आहे ?

जयपूर (राजस्थान) – राजसमंदमध्ये एका मुलीचा पुनर्जन्म झाल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. ९ वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या उषा या महिलेचा परावल या गावामध्ये रतनसिंह चुडावत यांच्या घरी एका मुलीच्या रूपात पुनर्जन्म झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या मुलीचे नाव किंजल असून ती ४ वर्षांची आहे. तिने पूर्व जन्माच्या संदर्भातील केलेले दावे तंतोतंत खरे ठरले आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि परिसरातील गावकरी यांच्यामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

१. किंजल ही गेल्या १ वर्षापासून तिच्या भावाला भेटण्याविषयी सांगत होती. मागील जन्मामध्ये तिचा मृत्यू कधी आणि कसा झाला, याविषयी ती सांगायची. प्रारंभी तिच्या पालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

२. एक दिवस तिची आई दुर्गा हिने किंजलला तिच्या वडिलांना बोलावण्यास सांगितले. तेव्हा किंजलने तिचे वडील म्हणजेच रतनसिंह हे पिंपलांत्री या गावात असल्याचे सांगितले. दुर्गाने याविषयी किंजलला परत विचाल्यावर तिने सांगितले की, तिचे आई-वडील, भाऊ आणि बहीण मिळून सर्व कुटुंब पिंपलांत्री येथे रहातात. तिचे वडील ट्रॅक्टर चालवतात आणि तिची सासूरवाडी ओडनमध्ये आहे. तिचा ९ वर्षांपूर्वी जळाल्यामुळे मृत्यू झाला होता आणि रुग्णवाहिका येथे सोडून गेली होती. यानंतर रतनसिंह यांनी मुलीला डॉक्टरांना दाखवले; पण तिला कोणत्याही प्रकारची मानसिक समस्या नसल्याचे लक्षात आले.

 (सौजन्य : News18 Rajasthan)

३. पिंपलांत्री येथे वर्ष २०१३ मध्ये उषा नावाच्या महिलेचा जळून मृत्यू झाला होता. हे गाव किंजलच्या गावापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. उषा ही तीच असल्याचे किंजलने सांगितले.

४. याविषयी महिती मिळाल्यावर एक दिवस पिंपलांत्री येथील उषाचा भाऊ किंजल हिला भेटायला आला. त्याला पाहून किंजलला अतिशय आनंद झाला. तिला भ्रमणभाषसंचामधील आई आणि उषा यांची छायाचित्रे दाखवली. ती छायाचित्रे पाहून ती रडायला लागली.