नेहमी ॲलोपॅथीला मोठे स्थान देणारे सरकार आपत्काळात आयुर्वेदाला महत्त्व देते, हे लक्षात घ्या !

‘सह्याद्रीच्या खोर्‍यात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आहेत. या वनस्पतींचा गुणधर्म जाणणार्‍या वैदूंची संख्याही मोठी आहे. त्या औषधांची ओळख पुढील पिढीला व्हावी, यासाठी लवकरच वैदूंची परिषद घेतली जाईल. यासाठी आयुष मंत्रालयाचे पथक आणून वनौषधींमधील गुणधर्म तपासले जातील. औषधी वनस्पतींचे संकलन झाल्यास आयुर्वेदाला त्याचा मोठा लाभ होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे ४०० प्रकारच्या वनस्पती आढळतात. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे प्रस्तावित असलेल्या वनौषधी प्रकल्पाला आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम मार्च – एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल’, अशी माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.’