संभाजीनगर येथे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर आक्रमण केल्याचे प्रकरण
प्रत्येक गुन्ह्यात धर्मांधांचा सहभाग असणे हे देशासाठी घातक आहे. धर्मांधांना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे. – संपादक
संभाजीनगर – विद्यार्थिनीची छेड काढणार्यास मज्जाव केल्याप्रकरणी मजिद जमील शेख (वय २४ वर्षे) याने कन्नड कारखाना परिसरातील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.पी. चव्हाण आणि अधीक्षक संतोष जाधव यांच्यावर तलवारीने प्राणघातक आक्रमण करून त्यांना गंभीर घायाळ केले. या घटनेनंतर मजिद हा पुणे येथे पळून गेला होता. पोलीस निरीक्षक दिनेश जाधव यांना तैनात केलेल्या ३ पथकांतील एका पथकाने त्याला पुणे येथून कह्यात घेऊन अटक केली आहे.