ब्रिटनमध्ये ज्यू लोकांच्या विरोधात खोटे वृत्त प्रसिद्ध केल्यावरून बीबीसीकडून चूक मान्य करत क्षमायाचना

अनेक दशकांपासून बीबीसी वृत्तवाहिनीकडून हिंदू आणि ज्यू यांचा द्वेष करत त्यांच्याविषयी चुकीची पत्रकारिता केली जात आहे. आता बीबीसीवर कारवाई होत असल्याने या वाहिनीकडून क्षमायाचना मागितली जात आहे; मात्र ब्रिटनने या प्रकरणी केवळ क्षमायाचनेवर बीबीसीला मोकळे न सोडता तिच्यावर कारवाई केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

नवी देहली – गेल्या वर्षी नोव्हेंबर मासामध्ये लंडनमध्ये ऑक्सफर्ड स्ट्रीटवरील एक व्हिडिओ समोर आला होता. यात काही लोकांचा गट ४० ज्यू तरुणांवर थूंकत होता आणि त्यांना शिवीगाळ करत होता. ते बसच्या खिडक्यांवर धक्का देत होते, असे वृत्त बीबीसीने देतांना ‘ज्यू तरुण मुसलमानविरोधी संभाषण करत असल्याने त्यांना शिवीगाळ करण्यात आली’, असे खोटे म्हटले होते.

ही खोटी बातमी असल्याने ब्रिटनच्या दूरसंचार नियामक विभागाने याची चौकशी चालू केली आहे. बीबीसीने या प्रकरणी स्वतःची चूक मान्य करून क्षमा मागितली आहे, तसेच मूळ वृत्तात पालट केल्याचे सांगितले आहे. या वृत्तावरून ब्रिटनमधील ज्यू लोकांनी बीबीसीच्या कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली होती.