मुंबई – राज्य सरकारने महिला पोलिसांना १२ घंट्यांऐवजी ८ घंटे काम देण्याचा निर्णय सप्टेंबरमध्ये घेतला होता. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर याची कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे.
सण-उत्सव बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा १२ घंट्यांपेक्षा अधिक वेळ महिला पोलीस काम करतात. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक उत्तरदायित्वावर आणि कार्यालयीन कामावरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. परिणामी त्यांच्यातील मानसिक ताण वाढत आहे. हे काही महिला पोलिसांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने त्यांना ८ घंटे काम देण्याचा निर्णय घेतला आहे.