‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेले सातारा येथील वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांना आलेल्या अनुभूती

‘१९ आणि २०.१२.२०२० या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील जिज्ञासूंसाठी सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी सातारा येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत, तसेच त्यांना आलेल्या अनुभूती यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

सौ. रेश्मा फाळके

१. ‘सत्संगामध्ये पुष्कळ चैतन्य जाणवले. सत्संग ऐकल्यापासून घरात चांगले वाटत आहे.

२. प्रत्यक्ष गुरुमाऊली घरी आल्यासारखे वाटले. ‘स्वतःतील स्वभावदोष न्यून करायला पाहिजेत’, हे लक्षात आले.

३. ‘खोटे बोलल्यावर केलेला नामजप वाया जातो’, हे समजले. त्यामुळे ‘खोटे बोलायचे नाही’, असे ठरवले आहे. यामुळे घरात शांत आणि चांगले वातावरण आहे.’

सौ. सुनिता गोडिया

‘वास्तूशुद्धी केल्याने घरातील वातावरण आनंदी रहाते. मी सतत नामस्मरण केल्याने माझा आत्मविश्वास वाढला. सत्संगामुळे ‘हिंदु जनजागृती समिती’विषयी चांगली माहिती मिळाली.’

सौ. विद्या मोहिरे

‘दळणवळण बंदीच्या काळात सत्संगामुळे नामस्मरण वाढले. त्यामुळे ‘श्रीकृष्ण जवळ आहे’, असे वाटू लागले.’

सौ. संगीता बागल

‘सत्संगामुळे रागावर नियंत्रण आले. नित्य जीवनात होणार्‍या चुका सुधारल्या. घरामध्ये शांतता मिळाली. आमच्या जीवनशैलीत पालट झाला.’

सौ. सुनंदा काटकर

१. ‘मी नामजप करायला आरंभ केल्यावर घरातील वातावरण शांत आणि आनंदी जाणवते. माझा नामजप भावपूर्ण होतो. मला सत्संगाची पुष्कळ आवड निर्माण झाली आहे.

२. गुरुदेवांचा श्लोक म्हणतांना सूक्ष्मातून त्यांच्या चरणांना हात लावल्यावर ‘त्यांचे चैतन्य माझ्या डोक्यातून सर्व शरिरात जात आहे’, असे मला जाणवते.’

सौ. जगुताई साठे

१. ‘दळणवळण बंदीच्या काळात घरच्या लोकांना काम नव्हते; मात्र नामस्मरण आणि गुरूंवरील श्रद्धा यांमुळे मला स्थिर रहाता आले. गुरूंवरील श्रद्धा आणखी दृढ झाली. ‘मी सत्संगात नसते, तर माझी स्थिती पुष्कळ बिकट झाली असती’, हे लक्षात आले.

२. साधिकांनी स्वभावदोषांविषयी माहिती दिली. सत्संगात सद्गुरु जाधवकाका यांनी ‘खोटे बोलले आणि शिवी दिली, तर ३० माळा नामजप वाया जातो’, हे सांगितले. त्यानंतर मी घरी कुणावर ओरडले नाही आणि कधी शिवीही दिली नाही.’

सौ. सरिता पाटील

१. श्राद्धाच्या दिवशी नामजप केल्यामुळे कावळ्यांना ठेवलेला दहीभात त्यांनी लगेच खाणे : ‘पितृपक्षात आमच्याकडे महालय श्राद्ध होते. ‘त्या दिवसांत ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अधिकाधिक करायचा असतो’, हे मला ठाऊक होते. श्राद्धाच्या दिवशी सकाळी मी स्वयंपाक केला आणि माझ्या यजमानांना आगाशीत दहीभाताचा नैवेद्य ठेवण्यास सांगितला. त्यांनी दहीभात ठेवल्यावर कावळ्यांनी तो लगेच खाल्ला. एरव्ही कावळ्यांसाठी ठेवलेला दहीभात तसाच रहातो. नामजप केल्यामुळे आम्हाला चांगली अनुभूती आली.’

(सर्व सूत्रांचा दिनांक ः जानेवारी २०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक