खरे स्वातंत्र्य म्हणजे काय ?

परात्पर गुरु परशराम पांडे

‘स्वातंत्र्य’ हा शब्द चांगलेपणाचे द्योतक आहे; मात्र कुणी सृष्टीच्या नियमाच्या / स्वातंत्र्याच्या विरुद्ध वागला, तर ते घातक आहे. यासाठी ‘स्वातंत्र्य कुणाला दिले पाहिजे ?’, हे स्पष्ट केले पाहिजे. ‘वाईट शक्तींना प्रोत्साहन देणे’ म्हणजे स्वातंत्र्य नव्हे !

स्वातंत्र्य = स्व + तंत्र. स्व म्हणजे आत्मा. तो शुद्ध, शाश्वत आणि चैतन्यमय आहे. त्यानुसार घेतलेला निर्णय सत्य आणि आनंद देणारा असतो. त्यामुळे त्याद्वारे झालेले मार्गदर्शन म्हणजे स्वातंत्र्य होय. स्व म्हणजे आत्मा, म्हणजेच भगवंत आणि स्वातंत्र्य म्हणजे भगवंताच्या इच्छेने होणारे कार्य ! चैतन्य हे भगवंताचे अस्तित्व असून शरीर हे त्याने दिलेले यंत्र आहे. त्याद्वारे ईश्वराची प्राप्ती होते. मानवी जीवनाचे ध्येय असलेली ईश्वरप्राप्ती सहज-सुलभपणे होण्यासाठी साधना हा मार्ग आहे आणि तो मार्ग निर्विरोध होणे म्हणजे खरे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होय. – (परात्पर गुरु) परशराम पांडे (महाराज), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.१२.२०१८)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.