हिंदु जनजागृती समितीचे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियान !

 सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन

अ. लोकप्रतिनिधी

सांगली विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांना, तसेच लेंगरे (विटा) येथे सरपंच श्रीमती राधिका बागल यांना निवेदन देण्यात आले.

आ. प्रशासन

१. मिरज येथे नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत व्यापारी सेनेचे श्री. पंडित (तात्या) कराडे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विठ्ठल मुगळखोड उपस्थित होते.

२. तासगाव येथे नायब तहसीलदार नागेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव आणि शिक्षण गटविकास अधिकारी डॉ. सुरेश शंकर पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना कामगार संघटना उपजिल्हाप्रमुख श्री. सचिन चव्हाण, कुमठे येथील धर्माभिमानी श्री. प्रवीण चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रशांत चव्हाण, राजेंद्र माळी आणि गजानन खेराडकर उपस्थित होते.

३. शिरोळ येथे निवासी नायब तहसीलदार श्री. योगेश जमदाडे यांना, तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना निवेदन देण्यात आले.

इ. शाळा

मिरज येथे ए.सी.एस् इंग्लिश स्कूल, शिरोळ येथे श्री पद्माराजे विद्यापीठ येथे मुख्याध्यापक श्री. सी.एस्. पाटील यांना, क्रांतीवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय प्रकाशनगर, सोनी येथे प्राचार्य प्रवीण चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

लेंगरे (विटा) येथे सरपंच श्रीमती राधिका बागल (डावीकडून दुसर्‍या) यांना निवेदन देतांना सौ. जयश्री वेदपाठक (उजवीकडे)
सांगली येथे भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ (उजवीकडे) यांना निवेदन देतांना सौ. स्मिता माईणकर आणि श्रीमती मधुरा तोफखाने
शिरोळ येथे श्री पद्माराजे विद्यापीठ येथे मुख्याध्यापक श्री. सी.एस्. पाटील (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. संजय घाटगे
शिरोळ येथे निवासी नायब तहसीलदार श्री. योगेश जमदाडे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
शिरोळ येथे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. संजय घाटगे (उजवीकडे)
मिरज येथे नायब तहसीलदार नारायण मोरे (डावीकडे) यांनी निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
स्व. श्रीमंतीबाई सातगोंडा पाटील (मजलेकर) प्रॅक्टिसिंग स्कूल येथे निवेदन देतांना कार्यकर्ते
तासगाव येथे गटविकास अधिकारी डॉ. सुरेश शंकर पाटील यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
तासगाव येथे पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव (उजवीकडे) यांना निवेदन देतांना शिवसेना कामगार सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. सचिन चव्हाण, तसेच अन्य
तासगाव येथे नायब तहसीलदार नागेश गायकवाड (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
क्रांतीवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रकाशनगर, सोनी येथे प्राचार्य प्रवीण चव्हाण यांना निवेदन देतांना सर्वश्री राज शिंदे, राजेंद्र माळी, प्रवीण चव्हाण

बेळगाव, खानापूर येथे प्रशासन, पोलीस, शिक्षण विभागात निवेदन !

हिंदु जनजागृती समितीचे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियान !

बेळगाव, २६ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियानाच्या अंतर्गत बेळगाव आणि खानापूर येथे प्रशासन, पोलीस, शिक्षण विभागात निवेदन देण्यात आले.

१. जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार मंजुनाथ जानकी (उजवीकडे) यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सौ. मिलन पवार, सौ. प्रणाली पवार, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्ज्वला गावडे आणि श्री. विजय नंदगडकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार मंजुनाथ जानकी (उजवीकडे) यांना निवेदन देतांना सौ. उज्ज्वला गावडे, श्री. विजय नंदगडकर, तसेच अन्य

२. खानापूर येथे तहसीलदार प्रवीण जैन यांना निवेदन देण्यात आले. या वेळी भाजप कार्यकर्ते श्री. बाळाराम सावंत, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री सदानंद मासेकर, रमेश शिगनाळकर, बबन मन्नोळकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. जिवाप्पा मयेकर आणि श्री. कोणेरी कुम्रतवाडकर, तसेच सनातन संस्थेचे श्री. हणमंत होनगेकर उपस्थित होते.

खानापूर तहसीलदार प्रवीण जैन (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. हणमंत होनगेकर आणि श्री. जिवाप्पा मयेकर

३. बेळगाव येथे शिक्षण विभागात बी.आर्. वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सौ. उज्ज्वला गावडे आणि सौ. वैशाली यादव उपस्थित होत्या.

शिक्षण विभागात बी.आर्. वाघमारे यांना निवेदन देतांना सौ. उज्ज्वला गावडे आणि सौ. वैशाली यादव

४. बेळगाव येथे गुन्हा आणि वाहतूक शाखेच्या अधिकारी स्नेहा पी.व्ही. यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्ज्वला गावडे, सौ. वैशाली यादव आणि श्री. विजय नंदगडकर उपस्थित होते.

गुन्हा आणि वाहतूक शाखेच्या अधिकारी स्नेहा पी.व्ही. (डावीकडे) यांना निवेदन सौ. उज्ज्वला गावडे, सौ. वैशाली यादव आणि श्री. विजय नंदगडकर