वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि राजुरा (जिल्हा चंद्रपूर) येथे प्रशासनाला निवेदन
वर्धा, २४ जानेवारी (वार्ता.) – हिंदवी स्वराज्याचा कणा असलेले शेकडो गड-दुर्ग राज्याचा ऐतिहासिक ठेवा आहे. या गडांवर धर्मांधांनी अनधिकृत बांधकामे, मजार, प्रार्थनास्थळे उभी करून त्यांचे ‘इस्लामीकरण’ करण्याचा घाट घातला आहे. ही सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्याची प्रक्रिया चालू करावी, तसेच यासाठी उत्तरदायी असणारे पुरातत्व विभागातील अधिकारी आणि अतिक्रमण करणारे मुसलमान यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालय अधीक्षक
श्री. लोखंडे, गडचिरोली येथे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. समाधान शेंडगे यांनी स्वीकारले. अशाच प्रकारचे निवेदन राजुरा येथील तहसीलदार श्री. हरीश गाडे यांनाही देण्यात आले.
समितीच्या वतीने वर्ध्याचे भाजपचे खासदार श्री. रामदास तडस यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनुप चौधरी, सौ. विजया भोळे आणि सौ. भार्गवी क्षीरसागर उपस्थित होत्या.
यवतमाळ येथेही जिल्हाधिकार्यांना निवेदन
नवी देहली येथील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग येथील महासंचालकांसाठी यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात या विषयाच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. हे निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे आकाश पाटणकर, नकुल आडे, प्रशांत सोळंके आणि दत्तात्रय फोकमारे उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर १०० हून अधिक अनधिकृत बांधकामे झाली. रायगड, कुलाबा, विशाळगड यांच्याप्रमाणे राज्यातील सर्वच गड-दुर्गांच्या ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत का ? याविषयी अहवाल शासनाला सादर करून ती अतिक्रमणे तात्काळ हटवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही अनधिकृत बांधकामे धार्मिक तेढ निर्माण करणारी ठरत आहेत. पुरातत्व विभागाच्या ज्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे घडले त्यांच्यावर आणि ज्या धर्मांधांनी अतिक्रमणे केली त्या सर्वांवर तत्काळ गुन्हे नोंद व्हायला हवेत.