गुन्हेगारांना पोलिसांचे भय नसल्याचे उदाहरण ! – संपादक
पुणे – नामांकित आस्थापनात नोकरी लावतो, परदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून देतो, सरकारी खात्यात नोकरी लावतो अशी नोकरीची आमीषे दाखवून तरुण-तरुणींची फसवणूक होत आहे. त्यातूनच गेल्या वर्षी शहरात ९०० गुन्ह्यांची नोंद झाली असून १ सहस्रहून अधिक तरुणांची ८५ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. पुणे शहरात वर्ष २०१९ या वर्षी नोकरीच्या आमीषाने फसवणूक झाल्याच्या ४३० तक्रारी प्रविष्ट झाल्या होत्या. वर्ष २०२० मध्ये दळणवळण बंदी असूनही अशा प्रकारच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तरुणांनी स्वत:ची फसवणूक टाळण्यासाठी जागरूक रहावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.