स्वत:च्या मुलांना विकणार्या धर्मांधांची क्रूर मानसिकता जाणा ! – संपादक
नवी मुंबई – नेरूळ रेल्वेस्थानक परिसरात रहाणार्या आयुब शेख याला स्वतःच्याच तीन मुलांची विक्री केल्याने अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी विकलेल्या मुलांना कह्यात घेण्यात आले असून विकत घेणार्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
शेख याच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला होता. ही मुलगी तिच्याकडे न दिसल्याने ३ दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी ठाणे महिला आणि बाल विकास विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाचे अधिकारी आणि नेरूळ पोलीस यांनी या महिलेला कह्यात घेऊन चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. या महिलेस ७ मुले असून त्यांपैकी नवजात मुलीला २ लाख रुपयांना विकले, तर यापूर्वी एका मुलीला ९० सहस्र रुपयांना आणि एका मुलास दीड लाख रुपयांना विकल्याचे तिने सांगितले.