युवकांनी स्वतःमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज जागृत करणे आवश्यक ! – अभिजीत कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

श्री. अभिजीत कुलकर्णी

सातारा – हिंदु युवकांनी आज भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवायला हवे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व युवकांनी शक्तीसमवेत भक्ती (साधना) करायला हवी. हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असल्यास हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे स्वतःमध्ये क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज जागृत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत कुलकर्णी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा येथे स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील युवकांसाठी शौर्यवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोप प्रसंगी श्री. कुलकर्णी बोलत होते. एक आठवडा चाललेल्या शौर्यवर्गामध्ये युवक आणि युवती यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय 

१. श्री. कुणाल मगर – आत्मरक्षण कसे करावे ? याचे मार्गदर्शन शौर्यवर्गातून मिळाले. शौर्यवर्गाला प्रार्थनेची जोड मिळाल्याने आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला. नवीन ऊर्जा मिळाली.

२. श्री. ऋतिक संकपाळ – प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता आहे. ही विद्या भविष्यात उपयोगी ठरणार आहे.

३. श्री. प्रथमेश – शौर्यवर्गात देवाचे अधिष्ठान आहे आणि भगवंतच आपल्याकडून शौर्यवर्गातील सर्व प्रकार करून घेत आहे, असे वाटायचे. शौर्य प्रसंग ऐकून पुष्कळ ऊर्जा मिळायची. वर्गाला जोडल्यापासून स्वतःमध्ये पुष्कळ पालट आणि अनेक स्वभावदोष न्यून झाल्याचे जाणवले.

४. प्रज्ञा पाटील – वर्गाच्या माध्यमातून पुष्कळ शिकायला मिळाले. प्रशिक्षण घेतल्याने दिवसभर ऊर्जा आणि उत्साह टिकून रहात असल्याचे जाणवले.