ब्रिटनमध्ये कोरोनाच्या संदर्भातील निर्बंधांमध्ये सूट !

मुखपट्टी (मास्क) लावणे आणि घरी राहून काम करणे बंधनकारक नाही !

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (उजवीकडे)

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाच्या संदर्भातील सर्व निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे. यात मुखपट्टी (मास्क) लावणे, तसेच घरी राहून काम करण्यासारख्या निर्बंधांचाही समावेश आहे. ब्रिटनमध्ये सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत अर्ध्याहून अधिक घट झाली आहे.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले की, आमच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, राष्ट्रीय स्तरावर कोरोनाचा अत्युच्च काळ येऊन गेला आहे. यामुळे लोकांना घरून काम करण्यासाठी आम्ही दबाव टाकणार नाही. मुखपट्टी लावायची कि नाही, हे लोकांनी ठरवावे.