आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने सोलापूर येथील अन्न आणि औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांना निवेदन
अशी मागणी का करावी लागते ? – संपादक
सोलापूर, २२ जानेवारी (वार्ता.) – खाद्यपदार्थांच्या बांधणीसाठी (पॅकिंगसाठी) वर्तमानपत्रांचा उपयोग न करण्याविषयी आदेश निर्गमित करावेत, या मागणीचे निवेदन येथील अन्न आणि औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांना देण्यात आले. या वेळी त्यांनी ‘समितीचे कार्य चांगले आहे. यापूर्वीही समितीच्या वतीने राबवण्यात येणार्या उपक्रमांमध्ये आम्ही सरकारच्या वतीने सहभागी झालो होतो, यापुढेही प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ माध्यमातून समितीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन समाजाचे प्रबोधन करू’, असे आश्वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.