पोलिसांच्या साहाय्यानेच गुंडांनी रेस्टॉरंटवर आक्रमण केल्याची माहिती उघड !

  • कळंगुट (गोवा) येथील रेस्टॉरंटवर आक्रमण केल्याचे प्रकरण

  • पोलीस निरीक्षक निलंबित

गुंडांना तोडफोडीसाठी साहाय्य करणारे गुंड प्रवृत्तीचे पोलीस अधिकारी !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘कळंगुट (गोवा) येथील प्रसिद्ध ‘सोझा लोबो’ रेस्टॉरंटमधील ‘पब’वर २८ डिसेंबर २०२१  या दिवशी प्रतिस्पर्धी व्यावसायिक आणि इतर ८० जण यांनी लोखंडी सळ्या, काचेच्या बाटल्या आणि चाकू यांनी आक्रमण केले होते. हे आक्रमण पूर्वनियोजित आणि पोलिसांना हाताशी धरूनच झाल्याची माहिती उघड झाली आहे. पोलीस अधीक्षक सुबीत सक्सेना (आय.पी.एस्.) सुटीवर गेल्याचे पाहून कळंगुटमध्ये ‘डान्स बार’ चालवणार्‍या एका दलालाने स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याला हाताशी धरून हे कृत्य केल्याचे, तसेच या आक्रमणात कळंगुट पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराचा प्रमुख सहभाग असल्याचे उघड झाले आहे. रेस्टॉरंटवरील आक्रमणावरून कळंगुट पोलिसांनी त्वरित कारवाई केली नाही, तर याविषयी लोकांकडून रोष व्यक्त झाल्यावर आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरच कळंगुट पोलिसांनी दोषींना कह्यात घेतले आहे. (अशा पोलिसांवर केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी नाही. त्यांना सेवेतून काढून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला पाहिजे, तरच अन्य असे कुणी करू धजावणार नाही ! – संपादक)’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या जवळच्या कार्यालयाला कळवा.