प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि तिरंग्याच्या रंगाचे मास्क विक्री करणार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

  • हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ

  • जबलपूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि नगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले निवेदन !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यावर काही कारवाई का करत नाही ? – संपादक

जबलपूर (मध्यप्रदेश) – राष्ट्रध्वज राष्ट्राची अस्मिता आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी कागदी अन् प्लास्टिक यांचे हेच राष्ट्रध्वज रस्ते, कचरा आणि नाले येथे फाटलेल्या अवस्थेत पडलेले असतात. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे अवैध सांगितले आहे. हे लक्षात घेऊन प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि तिरंग्याच्या रंगाचे मास्क यांची विक्री करणार्‍यांवर योग्य कारवाई व्हावी आणि अशा मास्कवर बंदी घालावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे जिल्हाधिकारी यांच्या नावाने कार्यालय अधीक्षक महेशसिंह जाटव यांना, तसेच नगरपालिका आयुक्त आशिष वशिष्ठ यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर आयुक्त वशिष्ठ यांनी ‘यासंदर्भात परिपत्रक काढून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन दिले.

या वेळी समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, श्री. अनिल गणोरकर, सौ. अर्चना गणोरकर, संजना गणोरकर उपस्थित होते.