सातारा येथे पटोले यांच्या विरोधात भाजपची पोलीस ठाण्यात तक्रार !

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काढलेल्या अपशब्दाचे प्रकरण

सातारा येथे पटोले यांच्या विरोधात भाजपची पोलीस ठाण्यात तक्रार

सातारा, १९ जानेवारी (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारहाण करण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अटक करावी, अशी मागणी सातारा जिल्हा भाजपने केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यांनी शहर पोलीस ठाण्यांमध्ये या प्रकरणी लेखी तक्रार प्रविष्ट केली आहे.

तक्रारीमध्ये म्हटले आहे, देशाचे पंतप्रधान हे भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च पद आहे. त्यांची सुरक्षितता हा सर्व भारतीय आणि सुरक्षा यंत्रणा यांचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कोणतेही चुकीचे विधान किंवा चुकीचे कृत्य करणे हे देशाच्या, तसेच सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षेविरुद्ध उचललेले पाऊल असते. अशा नेत्याविषयी जाणीवपूर्वक अपशब्द उच्चारणे, त्यांना मारहाण करण्याची भाषा वापरणे, त्यांच्या हत्येचा कट रचणे या सर्व गोष्टी देशद्रोहाच्या गुन्ह्यात मोडतात. काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पातळीवरील सर्वोच्च पदावर विराजमान असतांना आपल्या उत्तरदायित्वाचे आणि नैतिक नीतीमूल्यांचे भान विसरून नाना पटोले यांनी केलेले हे वक्तव्य दंडनीय अपराधातील आहे.