५ आरोपी अटकेत
|
नागोठणे (जिल्हा रायगड) – मुंबई येथे गोवंशियांचे मांस विक्रीसाठी घेऊन जाणारे २ टेम्पो नागोठणे पोलिसांनी १६ जानेवारीला पहाटे कह्यात घेऊन ५ जणांना अटक केली आहे. या टेम्पोतून १ लाख ९० सहस्र रुपये किमतीचे ९५० किलो गोवंशियांचे मांस कह्यात घेण्यात आले आहे. आझाद मोहल्ला येथे एका घरात गुरे कापून गोवंशियांचे मांस विकले जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून गोवंशियांचे मांस, ३ गायी, २ टेम्पो आदी साहित्य मिळून ६ लाख ५८ सहस्र रुपये किमतीचा मुद्देमाल कह्यात घेतला.
हिंदु जनजागृती मंचाकडून पोलिसांचा सन्मान !
गोमांसाची विक्री करणार्या टोळीला पकडणार्या पोलिसांना हिंदु जनजागृती मंचाने १७ जानेवारी या दिवशी अभिनंदनाचे पत्र देत त्यांचा सन्मान केला.
पोलिसांची कामगिरी आणि त्यांनी केलेली विनंती यांचा मान राखून हिंदु जनजागृती मंचाकडून बंदचे आवाहन मागे !
नागोठणे – येथील गोवंश कत्तलीच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती मंचाच्या वतीने २० जानेवारी या दिवशी सकाळी १२ वाजेपर्यंत ‘नागोठणे बंद’चे आवाहन केले होते. सर्व व्यापार्यांनी व्यवसाय बंद ठेवून ‘नागोठणे बंद’ला पाठिंबा देण्याविषयी नागोठणे व्यापारी असोसिएशननेही म्हटले होते; परंतु नागोठणे पोलिसांनी केलेली कौतुकास्पद कामगिरी आणि विनंती यांचा मान राखून हिंदु जनजागृती मंचाने बंदचे आवाहन मागे घेतले.
‘नागोठणे व्यापारी असोसिएशन’मध्ये ८० टक्के जैन धर्मीय असून त्यांचे शेतकर्यांशीही अत्यंत जवळचे संबंध आहेत, तसेच राजकीय हितसंबंधही आहेत; मात्र जैन धर्मीय हे जीवदया आणि अहिंसा याला प्राथमिकता देतात. त्यामुळे मोर्बा (जिल्हा रायगड) येथे होऊ घातलेले पशूवधगृह परमपूज्य विराट सागर महाराज आणि परमपूज्य विराग सागर महाराज यांच्या नेतृत्वाने रहित करण्यात आले होते.
पोलिसांनी हिंदु जनजागृती मंचला विश्वासात घेऊन ‘आरोपींवर कायदेशीर कारवाई करूच’, असे आश्वासन दिल्याने आणि बाजारपेठ बंदचे आवाहन मागे घेण्याची विनंती केल्याने मंचने तसा प्रतिसाद दिला.